पासवर्ड ही संकल्पना आता इतिहासजमा होणार


आपल्या विविध सोशल साईट्सवर असलेल्या अकाऊंटसचे पासवर्ड लक्षात ठेवणे हे आपल्या सर्वासाठीच कठीण काम असते. पण तुमचा चेहराच यापुढे तुमचा पासवर्ड असणार आहे. ई-मेल व इतर खाते लॅपटॉप किंवा संगणकासमोर चेहरा नेताच आपोआप उघडणार असल्यामुळे आता पासवर्ड ही संकल्पना इतिहासजमा होणार आहे.

आता संगणक आणि लॅपटॉपमध्ये आयफोनमध्ये असलेली फेसआयडी ऑथेंटिकेशनची सुविधा देण्यात येणार आहे. युजर्सना या तंत्रज्ञानामुळे पासवर्डशिवाय अकाऊंटमध्ये लॉग-इन करता येणार आहे. वेब ऑथेंटिकेशन स्टॅण्डर्ड इन्क्रिप्टेड हे नवीन तंत्रज्ञान फिडो अलायन्स आणि डब्ल्यू थ्रीसी या संकेतस्थळांनी आणले असल्यामुळे पासवर्ड, फिंगरप्रिंट सेंसर, कॅमेरा आणि यूटीबी बटनशिवाय केवळ चेहरा समोर नेताच अकाऊंट उघडता येणार आहे. या तंत्राचा मोझिला फायरफॉक्समध्ये समावेश करण्यात आला असून गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्टसुद्धा ही सुविधा युजर्सना देणार आहेत.

Leave a Comment