ऑफरचा पेटारा ‘जिओ’ने उघडला


मुंबई : रिलायन्स जिओने भारतात फोर जी नेटवर्क क्रांतीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली असल्याचे निरीक्षण नुकतेच लंडनच्या ‘ओपन सिग्नल’ या कंपनीने एक सर्वेक्षण जाहीर करत नोंदवळे आहे. नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी रिलायन्स जिओ नव-नवीन ऑफर घेऊन येते. जिओने आता पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी ऑफरचा पेटारा उघडला आहे.

नव्या ऑफरनुसार ९९९ रुपयांच्या एक फ्री जिओ फाय डिव्हाईस आणि १५०० रुपयांच्या किंमतीत १०० जीबी अतिरिक्त फोर जी डेटा ग्राहकांना मिळेल. ग्राहकांना यासाठी कमीत कमी १४९ रुपयांचा पहिला रिचार्ज करणे गरजेचे असेल. ग्राहकांना त्यासोबतच ९९ रुपयांत जिओची प्राईम मेम्बरशीप घ्यावी लागेल.

गूगल होम किंवा क्रोमकास्ट डिव्हाईस (फक्त भारतीय) च्या खरेदीवर ही ऑफर उपलब्ध असेल. ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेण्यासाठी रिलायन्स डिजिटल, रिलायन्स डीएक्स मिनी, जिओ स्टोअर डिव्हाईस खरेदी करता येईल. या ऑफरचा फायदा जिओ प्रीपेड ग्राहकही घेऊ शकतात.

१० जीबीचे १० वाऊचर म्हणजेच १०० जीबी ग्राहकांना माय जिओ अॅपमध्ये मिळतील. ग्राहकांना हे एका वर्षांच्या आत रिडिम करता येतील. सोबतच जिओ सिम अॅक्टिव्हेशनची तारीख १ एप्रिल २०१८ पेक्षा अगोदरची नसावी. ऑफर १० एप्रिल २०१८ पासून सुरू झाली आहे.

Leave a Comment