बर्गर नुडल्ससह चमचे आणि प्लेटचाही पाडा फडशा


जगभरात प्लास्टिक वापराने मानवी जीवनाला निर्माण केलेला धोका कसा कमी करायचा यासाठी संशोधन केले जात आहे. आजकाल खाद्यपदार्थ सर्व्ह करण्यासाठी प्लास्टिक प्लेट, चमचे सर्रास वापरले जातात. पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिक बाटल्या, ग्लास वापरले जातात. हा प्लास्टिक कचरा आरोग्यासाठी समस्या निर्माण करतोच पण पर्यावरणाचेही मोठे नुकसान करतो. प्लास्टिक जळत नाही, विरघळत नाही यामुळे ते नष्ट करणे सोपे काम नाही.


अर्थात जगभरातील संशोधक याला पर्याय शोधत आहेत.आणि त्यांच्या प्रयत्नांना चांगले यश मिळताना दिसत आहे. हैद्राबादचा नारायण पिस्पती यांनी धान्याच्या पिठापासून चमचे बनविले असून हे चमचे खाता येतात. ब्रिटन मधील स्टार्टअप कंपनीने समुद्री शेवाळापासून पाणी पिण्यासाठी बॉल बनविले आहेत. हे बॉलही पाणी पिऊन खाता येतात. याच शेवाळाचा वापर करून पॅकेजिंग सामग्रीही बनविली गेली असून बर्गर, नुडल्स त्यात पॅक करता येतात आणि हि प्लेट खाता येते.

न्युयोर्क मधील एका कंपनीने समुद्री गवतापासून कप बनविले असून ते आतील पेय संपले कि खाता येतात. पोलंड मधील कंपनीने गव्हाच्या कोंड्यापासून प्लेट बनविल्या आहेत. त्यात पदार्थ सर्व्ह करता येतात आणि पदार्थ संपल्यावर प्लेटचाही चट्टामट्टा करता येतो.

Leave a Comment