हे आहेत परफेक्ट ‘समर फूड्स’


उन्हाळ्याचा कडाका जसजसा वाढू लागतो, तसतसे थंड पदार्थ जास्त खावेसे वाटू लागतात. पण शरीराला थंडावा देणारे पदार्थ अपायकारक नसणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आईसक्रीम, मिल्क शेक असल्या पदार्थांचा आस्वाद घेताना वजन वाढणार नाही याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे अनेक फिटनेस गुरु उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आहारामध्ये काही परफेक्ट समर फूड्सचा समावेश करण्याचा आग्रह करतात. ह्या अन्नपदार्थांच्या मुळे वजन नियंत्रणात राहीलच, शिवाय शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण पुरेसे राहील.

अतिशय चविष्ट आणि भरपूर पाण्याने युक्त असे फळ म्हणजे कलिंगड. कलिंगडाच्या सेवनाने शरीरामध्ये उष्णता वाढत नाही, आणि पाण्याचे प्रमाण संतुलित राहते. कलिंगड किंवा कलिंगडाचा ताजा काढलेला रस दररोज सेवन करावा. रसामध्ये शक्यतो साखरेचा उपयोग करू नये. त्याचप्रमाणे काकडी ही देखील शरीराला, त्वचेला थंडावा देणारी आणि शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण वाढविणारी आहे. उन्हाळ्यामध्ये पुष्कळदा डोळ्यांची आग होते. अश्या वेळी काकडीचे काप डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो. तसेच काकडीचा समावेश आपल्या दररोजचा आहारामध्ये देखील अवश्य केलेला असावा. शक्य असल्यास काकडीवर वरून मीठ घालणे टाळावे. काकडीचा रस त्वचेला आर्द्रता देऊन त्वचा चमकदार बनविण्यासाठी उपयोगी आहे.

ताजी सेलेरी म्हणजेच ओव्याचे रोप पाश्चात्य खान पानामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. सेलेरी ताजी असावी. ही सेलेरी कच्ची सलाड प्रमाणे खाता येते, किंवा सूप्स, इतर भाज्यांच्या जोडीने शिजवून खाता येते. सेलेरी अन्नपचनास सहायक आहे. यामध्ये असलेले पाणी आणि इलेक्ट्रोलाईट्स उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला डीहायड्रेट होण्यापासून वाचवितात. तसेच याचा सेवनाने पाचन सुरळीत होऊन शरीर ‘ब्लोट ‘ होत नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment