चक्क १३२ कोटी रुपयात विक्रीसाठी ठेवली नंबरप्लेट


आपल्या आलिशान गाडीवरील नंबरप्लेट चक्क १३२ कोटी रुपयांना ब्रिटनमधील अफझल खान नावाच्या व्यक्तीने विक्रीसाठी ठेवली असून जवळपास ११० कोटी या प्लेटची मूळ किंमत असून त्यावर कर असल्याने एकूण १३२ कोटी रुपये मोजून ती संग्राहकाला विकत घेता येणार आहे. जर पिवळ्या रंगाच्या पट्टीवर ‘फॉर्म्युला १’ (F1) असे लिहिलेल्या या प्लेटची विक्री झाली तर ही नंबरप्लेट जगातील सर्वाधिक किंमतीत विकली गेलेली ठरेल.

काही वर्षांपूर्वी अफझल यांनी ‘फॉर्म्युला १’ लिहिलेली ही कारची नंबरप्लेट १०. ५२ कोटींना विकत घेतली होती. ही नंबरप्लेट त्यांच्या आलिशान बुगाटी कारवर होती. अशा काही परवाना असलेल्या नंबरप्लेट्स युकेमधील अनेकांकडे आहेत ज्या ते लिलावाच्या माध्यमातून विकू शकतात. त्याने ही नंबरप्लेट UK’s Regtransfers मार्फत विक्रीसाठी ठेवली आहे. UK’s Regtransfers ही युकेमधील सर्वात मोठी आणि अधिकृत नंबरप्लेट्सची विक्री करणारी वेबसाईट असून आपल्या आलिशान गाड्यांच्या नंबरप्लेट्स अनेक सेलिब्रिटींनी येथून विकत घेतल्या आहेत.

Leave a Comment