एअरटेल देणार रोज २ जीबी डेटा


मुंबई : सर्वच टेलिकॉम कंपन्या जिओमुळे दुरावलेल्या स्मार्टफोन युजर्सना पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी दर महिन्याकाठी वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्स, प्लान, पॅक यांची घोषणा करत आहेत. आता एअरटेल या प्रसिद्ध टेलिकॉम कंपनीने सुद्धा या स्पर्धेत उडी घेतली आहे. एअरटेल ४९९ रुपयांच्या रिचार्जमध्ये रोज २ जीबी इंटरनेट डेटा देणार आहे. ८२ दिवसांसाठी हा रिचार्ज पॅक असेल. म्हणजे एकदा रिचार्ज केल्यानंतर पुढील ८२ दिवस तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येईल.

सध्या आयपीएलचा हंगाम सुरु असून भारतात आयपीएलची जवळपास दोन महिने धामधूम असेल. ज्यांच्या घरी टीव्ही नाही किंवा टीव्ही असून ज्यांचा कायम प्रवासात वेळ जातो, असे लोक हॉटस्टारवर आयपीएल पाहतात आणि अर्थात असे लोक चांगल्या इंटरनेट पॅकेजच्या शोधात असतात. त्यात जिओ आणि बीएसएनएलने आधीचे हे हेरुन आपापले इंटरनेट प्लान जाहीर केले. आता यात एअरटेल कंपनीही उतरली आहे. ४९९ रुपयांचा रिचार्ज एअरटेलच्या ग्राहकांनी केल्यानंतर त्यांना लोकल आणि एसटीडी कॉल, मोफत रोमिंग, दररोज १०० एसएमएस, दररोज २जीबी इंटरनेट डेटा मिळेल.

Leave a Comment