स्टार्टअप स्ट्रॉम मोटर्सची तिचाकी इलेक्ट्रिक कार


मुंबईतील स्टार्टअप कंपनी स्ट्रॉम मोटर्सने भारतात त्यांची नवी इलेक्ट्रिक कार आर ३ शोकेस केली आहे. हि कॉम्पॅक्ट कार दोन दरवाजे आणि तीन चाकांची आहे. या कारला मागे एक चक आशून मुंबई, बंगलोर, दिल्ली अश्या मोठ्या शहरांसाठी ती खास बनविली गेली आहे. या कारची आर ३ प्युअर, आर ३ करंट आणि आर ३ बोल्ट अशी तीन व्हेरीयंट आहेत. ती ८० ते १२० किमी रेंज मध्ये असून तिची किंमत ३ लाख रुपयांपर्यत असेल.

ही कार चार्ज करायला ६ ते ८ तास लागतात मात्र २ तासात ती ८० टक्के चार्ज होते. या कारचे पेंटिंग दोन रंगात असून त्याला सनरुफ दिले गेले आहे. कारची बॉडी मजबूत असून अनेक अत्याधुनिक फिचर या कारमध्ये आहेत. या कारला फ्रंट व्हील हायड्रोलिक ब्रेक्स, एलईडी लाईट, क्लायमेट कंट्रोल सिस्टीम, ७ इंची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट, व्होईस कंट्रोल, २० जीबी ऑनबोर्ड म्युझिक स्टोरेज, वायफाय, मॅप नेव्हिगेशन फीचर्स आहेत. २ ते ३ जण यातून प्रवास करू शकतात. सामानासाठी जागा दिली गेली आहे तसेच की लेस एन्ट्री, पार्क असिस्ट रिअर कॅमेरा, पॉवरविंडोजची सुविधाही आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये ती विक्रीसाठी उपलब्ध होणार असून आत्ताच कंपनीकडे ३० ऑर्डर आल्याचे जाहीर केले गेले आहे.

Leave a Comment