कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच ‘अॅक्सिस बँके’च्या सीईओ शिखा शर्मा पायउतार


मुंबई : कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच ‘अॅक्सिस बँके’च्या सीईओ शिखा शर्मा पदावरुन पायउतार होणार असून शर्मांनी वर्षअखेरीस आपळे पद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

शिखा यांनी कार्यकाळ अडीच वर्षांनी कमी करण्याची विनंती करत पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शिखा शर्मा यांची अॅक्सिस बँकेच्या सीईओपदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्याच्या बोर्डाच्या प्रस्तावावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शिखा शर्मांचा निर्णय या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे.

शिखा यांनी आपला तीन वर्षांचा कार्यकाळ फक्त सात महिन्यांचा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. शिखा शर्मा यांची येत्या जून महिन्यात चौथ्यांदा सीईओपदी नियुक्ती होणार होती. २००९ पासून अॅक्सिस बँकेच्या सीईओपदाची धुरा शिखा शर्मा सांभाळत आहेत. आर्थिक क्षेत्रात इतकी वर्ष सीईओपद सांभाळणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत.

Leave a Comment