हॉनर १० चा लुक जारी


हुवाई ब्रांडचा हॉनर १० चा लुक लाँचपूर्वीच लिक झाला असून हा फोन १५ मे रोजी लंडन येथे लाँच केला जाणार आहे. लिक झालेल्या फोटोवरून फोनचे डिझाईन आणि फीचर्स समोर आली आहेत. हॉनर व्ह्यू १० काही दिवसापूर्वीच कंपनीने लाँच केला असून त्याची किंमत २९९९९ रुपये आहे.

नवा हॉनर १० कंपनीचा फ्लॅगशिप फोन असेल. त्याला ६ जीबी रॅम, १२८ जीबीची इंटर्नल मेमरी दिली जाईल. रीअरला ग्लास प्लेट असून या फोनसाठी चीनचा मशहूर गायक, अभिनेता ह्यु गे सदिच्छा दूत आहे. या फोनला ५.८ इंची स्क्रीन, ओरिओ ८.१ ओएस, १६ व २० एमपीचे ड्युअल रिअर कॅमेरे असतील आणि फिंगर प्रिंट सेन्सर फ्रंटला असेल असे समजते.

Leave a Comment