
प्रवासी कार क्षेत्रात भारतात नंबर वन असलेली मारुती आता मिनी ट्रक क्षेत्रात जम बसवीत असून त्याच्या सुपरकॅरी मिनीट्रक च्या विक्रीत यंदा वाढ झाली आहे. या ट्रकची विक्री २०१७-१८ सालाल्त १६-१७ च्या तुलनेत १० पट वाढली असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.
मारुती मिनीट्रक बाजारात बसवतेय बस्तान
मारुतीचा सुपरमिनी ट्रकची बाजारात टाटा एस, महिंद्र सुप्रो आणि पिअजिओ पोर्त्स बरोबर स्पर्धा करावी लागत आहे. मारुतीचा मिनी सुपरकॅरी २०१६ सप्टेंबर मध्ये बाजारात आला आहे. ७०० किलो वजन वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या ट्रकची विक्री त्यावेळी निवडक शहरात सुरु होती मात्र आता २५ राज्यात १४० शहरात १९० विक्री केंद्रांवर त्याची विक्री केली जात आहे. देशभरात लवकरच सर्वत्र विक्री केंद्रे सुरु केली जात असून दक्षिण आफ्रिका तसेच टांझानिया आणि अन्य देशात त्याची निर्यात केली जात असल्याचे कंपनी अधिकारी सांगतात.
