ह्या आहेत भारतातील अरबपतींच्या कन्या


भारतातील अनेक नामवंतांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल आपण नेहमी काही ना काही पाहत असतो, ऐकत असतो. पण त्यांच्या परिवारजनांच्या विषयी तितकीशी माहिती आपल्याला नसते.

अरबपती उद्योजक म्हटले म्हणजे सर्वात पहिले नाव येते ते मुकेश अंबानी यांचे. मुकेश आणि नीता अंबानी यांचे आकाश आणि अनंत हे दोन मुलगे असून, इशा ही त्यांची मुलगी आहे. इशा अविवाहित असून, २६ वर्षे वयाची आहे. सध्या आकाश अंबानी सोबत ‘जियो’ मोबाईल नेटवर्कचा प्रकल्प सांभाळत आहे.

सुप्रसिद्ध उद्योजक कुमारमंगलम बिर्ला याची कन्या अनन्या, एक उत्कृष्ट गायिका आहे. ‘ लीवीन द लाईफ ‘ ह्या अनन्याने गायलेल्या गीताला खूप लोकप्रियता मिळाली आहे. हे गीत युट्युबवर लोकप्रिय झाले असून ६० लाख पेक्षाही अधिक लोकांनी हे गीत पसंत केले आहे. संगीताव्यतिरिक्त अनन्या हिची मायक्रो फायनान्स फर्मही आहे. ह्या फर्मच्या अठरा शाखा भारतातील दोन राज्यांमध्ये कार्यरत आहेत.

सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात म्हणजे नव्या नवेली नंदा. नव्या नवेली ही अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा हिची कन्या आहे. नव्या, तिच्या ग्लॅमरस जीवनशैली मुळे सतत प्रसिद्धीच्या झोतामध्ये असते. तसेच सुप्रसिद्ध स्टील उद्योजक नवीन जिंदाल यांची कन्या यशस्विनी हिला नृत्याची आवड आहे. त्यामुळे तिने आपले करियरदेखील नृत्यक्षेत्रात केले आहे. आजवर यशस्विनीने आपल्या नृत्यकलेचे अनेक उत्कृष्ट नमुने डान्स शोजच्या माध्यमातून दिले आहेत.

मानसी किर्लोस्कर, भारतातील सुप्रसिद्ध टोयोटा किर्लोस्कर ह्या कंपनीची मालक असून, मानसी ही विक्रम किर्लोस्कर यांची कन्या आहे. मानसीची जीवनशैली अतिशय साधी असून, प्रसिद्धीच्या झोतापासून काहीसे लांब राहणे मानसीला आवडते. मानसी, ‘कलर्स’ नामक एनजीओ देखील चालविते.

बिसलेरी इंटरनॅशनलचे संचालक रमेश चौहान यांची कन्या जयंती ३३ वर्षांची असून, आपल्या वडिलांच्या बिजिनेसमध्ये हातभार लावत आहे.

Leave a Comment