उच्च रक्तदाब आणि मधुमेहवर नियंत्रण ठेवण्यास सहायक ग्रीन कॉफी


कॉफीचे प्रमाणाबाहेर केलेले सेवन शरीरास घातक ठरू शकते. विशेषतः ज्यांना अनिमिया, म्हणजेच ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल, त्यांच्यासाठी कॉफीचे अतिसेवन अपायकारक ठरू शकते. कॉफीच्या अतिसेवनाने आपण खात असलेल्या अन्नामधील लोह शरीरामध्ये अवशोषित होऊ शकत नाही, म्हणून अनिमिया असलेल्या व्यक्तींसाठी कॉफीचे अतिसेवन हानिकारक आहे. या उलट ग्रीन कॉफीचे सेवन शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे. ह्या कॉफी मध्ये कॅफिनचे प्रमाण नगण्य असल्यामुळे ह्या कॉफीच्या सेवनाने शरीराला अपाय होण्याची शक्यता कमी असते. सामन्यपणे प्यायल्या जाणाऱ्या कॉफीमध्ये सात ते नऊ टक्के कॅफिन असते. पण ग्रीन कॉफीमध्ये मात्र हे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे मनाप्रमाणे, हवी तितकी कॉफी पिऊनही तुम्ही कॅफिनचे शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळू शकता.

ग्रीन कॉफीच्या सेवनाने शरीरामध्ये चैतन्य, उत्साह राहतो. ह्या कॉफी मध्ये असणाऱ्या तत्वांमुळे शरीराचे चयापचय देखील चांगले राहण्यास मदत होते. परिणामी शरीरामध्ये सकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो. ह्या कॉफीमध्ये जीवनसत्वे आणि क्षार असतात. ह्यांच्यामुळे शरीराला पोषण मिळते. ह्या कॉफीच्या सेवनाने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. ह्या कॉफीमध्ये अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असून, शरीरामध्ये असणाऱ्या घातक तत्वांपासून संरक्षण देण्याचे काम ही कॉफी करते.

हे कॉफी कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया न वापरता तयार केलेली असते. ह्या कॉफीच्या सेवनाने मधुमेह आणि उच्चरक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. तसेच ह्या कॉफीच्या सेवनाने शरीरातील प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते. कोलेस्टेरोल नियंत्रित ठेवण्यासही ही कॉफी सहायक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment