
अॅप सेवा देणारी कंपनी ओला त्यांच्या कॅब आणि ऑटो सेवा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष विमा योजना सुरु करत आहे. यात ग्राहक १ रुपयात ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळवू शकणार आहे. त्यासाठी ओलाने जनरल इन्शुरन्स कंपनी आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड यांच्याबरोबर करार केला आहे.
ओला ग्राहकांना १ रुपयात देणार ५ लाखाचे विमा संरक्षण
कंपनीचे मुख्य अधिकारी विशाल कौल यासंदर्भात माहिती देताना म्हणाले आमचे प्रवासी १ रु. ५ लाखाचे विमा कव्हर मिळवू शकणार आहेत. तसेच रेंटल कार कव्हर १० रुपयात तर शहराबाहेर याच विम्यासाठी १५ रुपये भरावे लागतील. याचा फायदा ११० शहरातील सुमारे १२.५ कोटी ग्राहकांना होणार आहे. या विमा कव्हर मध्ये फ्लाईट चुकणे, सामान हरविणे यासाठीही भरपाई मिळणार आहे.
कंपनीने यापूर्वी रेल्वेच्या आयआरसीटीसी बरोबर कॅब करार केला असून ग्राहक रेल्वेच्या साईटवरून ओला कॅब बुक करू शकणार आहेत. सध्या सहा महिन्यासाठी हा प्रयोग केला जात आहे. यामुळे ग्राहक सात दिवस अगोदर कॅब बुक करू शकतो.
