किती बोलतात या बायका?


बायका आणि बडबड यांचे अतूट नाते आहे आणि जगातील कोणताही देश याला अपवाद नाही. बायका सतत बोलतात याला आता संशोधनाचा आधार मिळाला आहे. त्यासंदर्भातला एक अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. यासाठी अमेरिकेच्या मेरीलंड विद्यापीठातील तज्ञांनी संशोधन केले आहे. या अहवालानुसार महिला एका दिवसात साधारण २० हजार शब्द बोलतात तर पुरुषांच्यात हे प्रमाण दिवसाला १३ हजार शब्द असे आहे.

बायका जास्त का बोलतात याचाही शोध यात घेतला गेला आहे. त्यात बायकांच्या अधिक बोलण्याला त्याच्या मेंदूतील लोच्या कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. म्हणजे बायकांच्या मेंदूत फॉक्सपी नावाचे एक रसायन जास्त असते. हे एक प्रकारचे प्रोटीन आहे. या रसायनामुळे लहानपणी मुलांच्या तुलनेत मुली लवकर बोलू लागतात. या प्रोटीनमुळे शब्दकोश अधिक वाढतो. बायका नोकरीत लंच टाईम मध्ये सर्वाधिक बोलतात इतकेच काय पण कामावर जाता येता अनोळखी लोकांशीही बोलतात.


हे संशोधन करण्यासाठी सोशियो मीटर या उपकरणाचा वापर केला गेला. हे हातात घालता येणारे स्मार्टफोन सारखे उपकरण असून युजरच्या बोलण्याचा रिअल टाईम देता ते गोळा करते. या अभ्यासात काही मनोरंजक माहितीही समोर आली आहे. त्यानुसार ७ विद्यापीठातील फॅकल्टी मिटिंगचे रेकोर्डिंग केले गेले तेव्हा मिटिंग मध्ये बायकांच्या तुलनेत पुरुष अधिक बोलतात मात्र मिटिंग संपल्यावर बायका बाहेर येऊन अधिक कॉमेंट करतात.

Leave a Comment