आता दररोज धावणार मुंबई-शिर्डी ‘साईनगर एक्सप्रेस’


मुंबई : शिर्डीसाठी मुंबईहून आठवड्यातून तीन दिवस धावणारी शिर्डी साईनगर एक्सप्रेस आता दररोज धावणार असून रेल्वे मंत्रालयाने साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या मुंबईकर भाविकांना मोठी खुशखबर दिली आहे. आठवड्यातून सोमवारी, बुधवारी, आणि शनिवारी शिर्डीसाठी सुटणारी ‘दादर-साईनगर शिर्डी’ही एक्सप्रेस यापुढे दररोज धावेल, अशी घोषणा रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. तसेच शिर्डीच्या साईनगर रेल्वे स्टेशनच्या विस्तारीकरणालाही मंजुरी देण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी शिर्डीत येऊन साईदर्शन घेतले आणि साईनगर रेल्वे स्टेशनची पाहणीही केली.

Leave a Comment