भारतीय नौदलाचे विमान संग्रहालयात रूपांतरित


विशाखापट्टनम – टी.यु १४२एम या भारतीय नौदलाचे विमानाचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले असून हे विशाखापट्टनमच्या अनेक पर्यटन स्थळांपैकी पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. हे संग्रहालय पाहण्यासाठी बरेच पर्यटक येतात. या संग्रहालयाला उन्हाळ्याच्या सुट्टीत १६०० ते १८०० पर्यटक दररोज भेट देतात तर आठवड्याच्या शेवटच्या दिवसात हा आकडा चक्क ३००० पर्यंत पोहोचतो. लहान मूलांना हे संग्रहालय भारतीय सुरक्षा दलात भरती होण्यासाठी प्रेरणादाई ठरत आहे.

सैन्यात २९ वर्ष सेवा बजावल्यानंतर या विमानाला २०१७ साली निवृत्त करुन संग्रहालयात रूपांतरित करण्यात आले होते. आर.के बिच रोडवर सबमरीन संग्रहालया समोर हे विमान ठेवण्यात आले आहे. विमानाच्या आत जाण्यापूर्वी विमानाचे विविध भाग एका प्रदर्शन हॉलमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. यात सोनोबोयज, डेटा रॅकॉर्डर, सरवायवल किट, प्रोपेलर, एन्टी सबमरीन मिसाईल सारखे भाग सामिल आहेत. विशाखापट्टणम अर्बन डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या अंतर्गत हे संग्रहालय असून पर्यटकांना असेच आकर्षित करत राहण्यासाठी संरक्षण प्रमुख व कार्यरत असलेले सर्व अधिकारी त्तपर आहेत.

Leave a Comment