दररोज मेडीटेशन केल्याने वार्धक्यातही मेंदू राहील सजग


आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण फिट असावे असे प्रत्येकालाच वाटत असते. त्या मुळे आपापल्या कामांमधून प्रत्येक जण आपल्याला जमेल तसा वेळ काढून फिट राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत असतो. पण सत्तरीच्या पुढील व्यक्तींसाठी ही बाब काहीशी अवघड बनते. एक तर ह्या वयामध्ये शरीर पूर्वीसारखे बळकट राहिलेले नसते, त्यातून निरनिराळ्या व्याधी उद्भवितात. काहींच्या बाबतीत संधिवात, तर काहींच्या बाबतीत दृष्टीदोष, कमी ऐकू येणे अश्या तक्रारीही उद्भवू लागतात. पण ह्या सर्वांमध्ये सर्वात गंभीर बाब असते, ती गोष्टींचा विसर पडणे, किंवा सामारांशक्ती जाणे, ही. ह्या वयामध्ये मेंदू तितकासा सजग राहत नसल्यामुळे अश्या व्यक्तींना गोष्टी लक्षात ठेवण्यास अडचण भासू लागते. पण नुकत्याच झालेल्या एका रिसर्च मध्ये हे निदान करण्यात आले आहे की दररोज साधारण वीस मिनिटे मेडीटेशन किंवा ध्यान धारणा केल्याने मेंदू सजग राहून विसराळूअन किंवा ‘डीमेंशिया’ होण्याचा धोका पुष्कळ प्रमाणात कमी होऊ शकतो.

‘कॉग्नीटिव्ह एनहान्समेंट ‘ नामक एका मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या ह्या रिसर्च नुसार तीन महिने विपश्यना किंवा ध्यान धारणा करण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतल्याने अनेक वृद्ध व्यक्तींना तत्याचा लाभ झाल्याचे निदान करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण घेणाऱ्यांची बौद्धिक क्षमता कमी होण्याचा धोका उद्भविण्याची शक्यता पुष्कळ अंशी कमी झालेली आढळली. तसेच दररोज काही काळाकरिता केलेल्या ध्यान धारणेचे फायदे पुढे अनेक वर्षांपर्यंत होत असल्याचे निदान ही ह्या रिसर्चमध्ये करण्यात आले आहे.

अमेरिकेतील डेव्हीस येथे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया मधील शोधकर्त्यांनी तीस लोकांच्या बौद्धिक क्षमतेचे आकलन करून हा निष्कर्ष काढला आहे. ह्या सर्व तीस वृद्ध व्यक्तींनी तीन महिन्यांकरिता ध्यान धारणा करण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले होते. ह्या रिसर्चमध्ये असे दिसून आले की, ज्या व्यक्तींना ध्यान धारणेची सवय होती, त्यांचे मानसिक आरोग्य, ध्यान धारणेची सवय नसलेल्या व्यक्तींच्या मानाने अधिक चांगले होते. तसेच वार्धक्य आले असतानाही या व्यक्तींची स्मरणशक्ती उत्तम असल्याचे निदर्शनास आले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment