कशी सुरु झाली एप्रिल फूल बनवण्याची प्रथा?


१ एप्रिल म्हणजे लहानग्यांपासून ते वयस्करांपर्यंत सर्वजण एकमेकांना मुर्ख बनविण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. पण ‘एप्रिल फूल’ हा दिवस १ एप्रिललाच का साजरा केला जातो? याबद्दलची माहिती तुम्हाला आहे का ? फ्रान्समधून एप्रिल फूल साजरा करण्याची सुरूवात झाली. १५८२मध्ये प्रत्येक युरोपियन देशाला ज्यूलियन कॅलेंडर सोडून ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्याचे निर्देश पॉप ग्रेगरी १३ यांनी दिले होते. १ एप्रिलपासून नाही तर १ जानेवारीपासून ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये नवे वर्षे हे सुरू होते. हे मानण्यास अनेक लोकांनी नकार दिला तर काहींना याबद्दल माहितीही नसल्यामुळे ते नववर्ष १ एप्रिललाच साजरे करतात. अशांना एप्रिल फूल म्हटले जाऊ लागले. यादिवशी प्रॅंक करून एकमेकांना मुर्ख बनवू लागले. बघता बघता ही प्रथा युरोपमध्ये पसरली. आता हा दिवस संपूर्ण जगात एकमेकांना मुर्ख बनविण्यासाठी साजरा केला जाऊ लागला. जपान आणि जर्मनीमधील लोक पूर्ण दिवस प्रॅंक करत असतात. हा दिवस स्कॉटलॅंडमध्ये सलग २ दिवस साजरा केला जातो. फ्रान्समध्ये याला ‘फिश डे’ असे म्हटले जाते. यादिवशी लहान मुल कागदाची मच्छी एकमेकांच्या पाठीवर चिटकवून दिवस साजरा करतात.

Leave a Comment