जिओची प्राइम मेंबरशिप वर्षभरासाठी मोफत


मुंबई – रिलायन्स जिओच्या प्राईम मेंबर्सची सेवा आज मार्चला संपणार होती. ग्राहकांना त्यामुळे ही सेवा बंद होणार किंवा यापूर्वी केलेल्या रिचार्जचे काय होणार? असा प्रश्न पडला होता. पण रिलायन्स जिओने काल रात्री प्राईम युजर्ससाठी मोठी घोषणा करत मेंबरशीप एका वर्षांसाठी मोफत असल्याचे जाहिर केले आहे.

पुढील एक वर्षांसाठी वैधता वाढणार असून ग्राहकांना प्राइम मेंबरशीपचे सर्व फायदेही मिळणार असल्यामुळे अनेक आकर्षक ऑफर्सचा ग्राहकांना फायदा मिळणार आहे. या युजर्सना आता त्यामुळे पुढील एक वर्षांसाठी प्राईम युजर्सचे सर्व फायदे मिळणार आहेत. याअंतर्गत तुम्हाला ज्या ऑफर्स मिळत होत्या त्या अशाच पुढील एक वर्षांसाठी वापरता येणार आहेत. युजर्सला ही जिओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणादरम्यान माहिती दिली. त्याचबरोबर ज्या लोकांनी आजवर जिओची प्राइम मेंबरशीप घेतलेली नाही त्यांना यानंतरही ९९ रुपयांत प्राइम मेंबरशीप घेता येणार आहेत.

Leave a Comment