महाभारतातील ह्या कथा तुम्हाला माहित आहेत का?


‘महाभारत’ हा महाग्रंथ आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. यातील अनेक घटना आपण लहानपणापासून गोष्टींच्या रुपात ऐकत आलो. पण या महान रचनेविषयी अशी काही तथ्ये आहेत, जी तितकीशी सर्वश्रुत नाहीत. त्याच तथ्यांच्या बद्दल थोडेसे..

वेद व्यास यांनी निर्माण केलेली, कुरुक्षेत्रातील कौरव-पांडवांच्या मधील युद्धाची कथा वर्णन करणारी ही महान रचना ‘ महाभारत ‘ म्हणून ओळखली जाण्यापूर्वी ‘ जय ‘ म्हणून ओळखली जात असे. कालांतराने वेद व्यासांच्या दोन शिष्यांनी ह्या मूळ रचनेमध्ये भर घातली. उग्रसवाने ह्या रचनेमध्ये भर घातल्यानंतर ही रचना ‘ महाभारत ‘ या नावाने ओळखली जाऊ लागली. ह्या महाग्रंथाची रचन जिथे केली गेली ती गुंफा ‘गणेश गुहा’ यान्नावाने ओळखली जाते. इथेच महर्षी वेद व्यासांनी महाभारत सांगितले, व भगवान गणेशाने ते लिहिले. ही गुहा उत्तराखंडमधील बद्रीनाथ देवस्थानापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर आहे.

महाभारतातील एका घटनेमध्ये भीमाला विष देऊन नदीमध्ये सोडून देण्यात आल्याच्या घटनेचे वर्णन आहे, ह्या नदीमध्ये अनेक सर्पांनी भीमाला वारंवार दंश केला, त्यामुळे भीमाच्या शरीरातील विष निघून त्याचे प्राण वाचले अश्या आश्चर्यचकित करणाऱ्या प्रसंगाचे वर्णन महाभारतामध्ये केले गेले आहे. त्याचप्रमाणे शकुनी आणि दुर्योधनाने महा अघोरी नामक तांत्रिकाच्या मदतीने जादू टोणा करवून भीमाला मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचे वर्णन ही महाभारतामध्ये आहे.

कुरुक्षेत्रातील पहिले युद्ध भीष्म आणि परशुराम यांच्यामध्ये झालेले द्वंद्व होते. भीष्माने अम्बेशी विवाह करण्यास नकार दिल्यामुळे परशुरामाने भीष्माला युद्धाचे आव्हान दिले. गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये झालेले हे द्वंद्व कुरुक्षेत्रावरील पहिले युद्ध होते. ह्या युद्धामध्ये दोघांपैकी कोणीच विजयी झाले नाही आणि सरतेशेवटी परशुराम आपल्या शिष्याला आशीर्वाद देऊन निघून गेल्याचे वर्णन महाभारतामध्ये आहे. तसेच सप्तर्षींपैकी एक असलेले महर्षी अत्री यांनी महामुनी दद्रोणाचार्यांना युद्धभूमीमध्ये लढताना पाहिल्यानंतर त्यांनी द्रोणांना त्यांच्या ब्राह्मणधर्माची आठवन करून देत शस्त्र सोद्न्ह्यास सांगितले. कौरव आणि पांडव यांचामध्ये युद्ध न होता शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी अत्री ऋषींनी निकराचे प्रयत्न केले असल्याचा उल्लेख महाभारतामध्ये आहे.