
नवी दिल्ली – आयडीबीआय बँकेकडून आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील पाच शाखांमधून ७७२ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे सांगण्यात आले आहे. २००८-०९ ते २०१२-१३ या आर्थिक वर्षांदरम्यान यातील काही कर्जे मत्स्यपालन क्षेत्रासाठी वितरित करण्यात आली होती. अस्तित्वात नसणा-या तलावांमध्ये बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने बँकेची फसवणूक करण्यात आली आहे.
आता आयडीबीआय बँकेतील ७७२ कोटींचा घोटाळा उघड
कर्जासाठी गहाण ठेवण्यात आलेल्या संपत्तीचे मूल्य अधिक सांगण्यात आले होते. पीएनबीप्रमाणे या घोटाळय़ातही बँकेतील दोन अधिका-यांचाही हात असल्याचे समोर आले. यापैकी एक निवृत्त झाला असून दुस-याला बडतर्फ करण्यात आले. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असून दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. बुधवारी बँकेचा समभाग ५ टक्क्यांनी घसरत बंद झाला. यापूर्वी पंजाब नॅशनल बँक आणि भारतीय स्टेट बँकेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते.
