कडकनाथाची लढाई मध्यप्रदेशाने जिंकली


कडकनाथ या काळ्या रंगाच्या कोंबड्याची भौगोलिक ओळख म्हणजे जीआयई टॅग मिळविण्यात मध्यप्रदेशाला यश आले असून चेन्नई येथील जीआयई टॅग देणाऱ्या नोंदणी संस्थेने कोंबड्याची हि प्रजाती मुळची मध्यप्रदेशाची असल्याचा निर्णय दिला आहे. हा निर्णय एकदोन दिवसात अधिकृतरित्या जाहीर केला जाईल असे समजते. या कोंबड्यावर छत्तीसगड राज्याकडून दावा केला गेला होता.

चेन्नईयेथील नोंदणी संस्थेने कागदपत्रे आणि ऐतिहासिक पुरावे तपासल्यानंतर मध्यप्रदेश राज्याच्या बाजूने निकाल दिला असल्याचे समजते. मध्यप्रदेश सरकारने कडकनाथ नावाने अॅप लाँच करून त्याचे लोकार्पण केले आहे. यामुळे या कोंबड्याचा व्यापार करणाऱ्या समित्यांना आधुनिक मंच आणि आधुनिक बाजार सुविधा मिळणार आहेत. या अॅपचा मदतीने सर्वसामान्य माणूस समितींशी संपर्क साधून कडकनाथ साठी मागणी नोंदवू शकणार आहे. भविष्यात ऑनलाईन मागणीसाठी होम डिलिव्हरी सुविधा दिली जाणार आहे. या अॅप मध्ये झाबुआ, अलीराजापूर, देवास कोंबडी पालन करणाऱ्या चार सहकारी सामित्यांबरोबर अन्य २१ समित्यांची माहिती दिली गेली आहे.

सर्वप्रथम झाबुआ आदिवासी परीवारांतर्फे ग्रामीण विकास ट्रस्टने २०१२ साली कडकनाथ प्रजाती जीआयई नोंदणीसाठी अर्ज केला गेला होता त्यात नंतर पशुपालन विभाग सामील झाला होता. या कोंबड्याचा मांसात कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते आणि प्रोटीन जास्त असतात. या कोंबड्याचे रक्त, मांस काळ्या रंगाचे असते.

Leave a Comment