अखेर शाओमीने लॉन्च केला बहुप्रतिक्षित ‘एमआय मिक्स २ एस’


मुंबई : बहुप्रतीक्षित ‘एमआय मिक्स २ एस’ स्मार्टफोन प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी शाओमीने लॉन्च केला असून या नव्या स्मार्टफोनलाही आधीच्या स्मार्टफोनसारखाच लूक देण्यात आला आहे. पण फीचर्समध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या नव्या स्मार्टफोनमध्ये अनेक आकर्षक फीचर्स देण्यात आले असून, हा स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

त्यानुसार ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटसाठी ३४ हजार २०० रुपये, तसेच ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटसाठी ३७ हजार ३०० रुपये आणि ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटसाठी ४१ हजार ४०० रुपये मोजावे लागणार आहेत.

एक हजार रुपयांचा वायरलेस चार्जर ८ जीबी व्हेरिएंटच्या स्मार्टफोनसोबत मोफत दिला जाणार आहे. याआधीच्या ‘एमआय मिक्स २’ या स्मार्टफोन सारखा ‘एमआय मिक्स २ एस’ स्मार्टफोनचा फ्रंट लूक आहे. पण फीचर्समध्ये काही बदल करण्यात आले आहेत. फोटोग्राफीसाठी २एक्स झूमसोबत रिअर पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. दोन्ही कॅमेरे १२-१२ मेगापिक्सेलचे असून, १८:९ च्या आस्पेक्ट रेशोसह ८.९९ इंचाचा पूर्णपणे एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. सेल्फीसाठी ५ मेगापिक्सेलचा स्नॅपर देण्यात आला असून, फोन सिक्युरिटीसाठी मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. याचसोबत फेसलॉकची सुविधाही देण्यात आली आहे.

Leave a Comment