पॅनकार्डला ‘आधार’देण्यास पुन्हा मुदत वाढ


नवी दिल्ली – पॅन कार्ड व आधार कार्ड क्रमांक लिंक करण्याच्या मुदतीत केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) ३० जूनपर्यंत वाढ केली असून सध्याच्या ३१ मार्चपर्यंतच्या अंतिम मुदतीत कर खात्यातील धोरण बनवणाऱ्या मंचाने ३० जूनपर्यंत वाढ करण्यात आल्याचा आदेश जारी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी आधार जोडणी संदर्भात विविध सेवादात्यांना अंतिम मुदतीत वाढ करण्याचे आदेश दिल्यानंतर सीबीडीटीने हे पाऊल उचलले आहे. सरकारतर्फे पॅन क्रमांक आधारशी जोडण्यासाठी देण्यात आलेली ही चौथी मुदतवाढ आहे. शासनाने आयकर भरण्यासाठी व नवीन पॅन कार्ड मिळवण्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य केले आहे.

Leave a Comment