नवी इलेक्ट्रिक बेस्ड ई-ट्रॉन एसयूव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत ऑडी


नवी दिल्ली : आपली नवी इलेक्ट्रिक बेस्ड ई-ट्रॉन एसयूव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत लग्झरी कार बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑडी कंपनी असून ३० ऑगस्ट २०१८ रोजी बेल्जियममधील ब्रुसेल्समध्ये या गाडीचे प्रोडक्शन मॉडल लॉन्च करण्याची शक्यता आहे.

कॉन्सेप्ट मॉडल २०१८ जिनेवा मोटर शोमध्ये कंपनीने याचे सादर केले होते. जर्मन कार निर्माता कंपनीने घोषणा केली आहे की, ८०,००० यूरो (जवळपास ६४.०८ लाख रुपये) पासुन जर्मनीत याची किंमत सुरु होणार आहे.

ई-ट्रॉन इलेक्ट्रिक एसयूव्ही युरोपियन बाजारात २०१८च्या शेवटपर्यंत ऑडी कंपनी लॉन्च करणार आहे. त्यानंतर २०१९ पर्यंत इतर बाजारात लॉन्च करण्यात येईल. भारतीय बाजारपेठेत ही कार लवकरच लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण, ऑडीने भारतात ई-ट्रॉनचे ट्रेडमार्क यापूर्वीच रजिस्टर्ड केले आहे.

सीबीयु रुटच्या माध्यमातून ही कार भारतात लॉन्च करण्यात येणार असल्यामुळे या कारची किंमत दुप्पट होण्याची शक्यता आहे. सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम)च्या मते, सर्व गाड्यांवर आयात शुल्क त्याच्या किमतीच्या १०० टक्के लावण्यात येणार असल्यामुळे या कारची किंमत १.३ कोटी रुपयांच्या घरात पोहचणार आहे.

९५ kWh ची बॅटरी ऑडी ई-ट्रॉन मध्ये देण्यात येणार आहे. ही बॅटरी ४३५ पीएसची पावर आणि ८००एनएमचा टॉर्क जनरेट करेल. ही कार ० ते १०० किमीचा स्पीड पकडण्यासाठी केवळ ४.६ सेकंदांचा वेळ घेते. एकदा पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर ही कार ५०० किमीपर्यंत चालू शकते. या कारचा टॉप स्पीड २१० किमी प्रतितास आहे.

Leave a Comment