‘प्लेबॉय’ने डिलीट केले आपले फेसबुकपेज


फेसबुक केंब्रिज अॅनालिटीकाच्या डेटा चोरी प्रकरणानंतर चांगलेच वादात सापडले. व्हॉट्सपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी हे प्रकरण समोर आल्यानंतर ट्विटवर फेसबुक डिलीट करण्याची योग्यवेळ आली असल्याचे म्हटले होते. अमेरिकन उद्योग सम्राट इलॉन मस्क यांनी देखील त्यापाठोपाठ आपल्या ‘स्पेसएक्स’ आणि ‘टेस्ला’ कंपनीचे फेसबुक अकाऊंट डिलीट केले.

आता यापाऊलावर पाऊल ठेवत १९५३ सालापासून ललनांच्या दिलखूश छायाचित्रांच्या माऱ्यामुळे जगभर प्रसार झालेल्या प्लेबॉय मासिकाने देखील आपले फेसबुक अकाऊंट डिलीट करत असल्याचे प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. अडीच कोटीहून अधिक फॉलोअर्स प्लेबॉयचे फेसबुकवर आहेत. आम्ही फेसबुक डेटा लीक प्रकरण समोर आल्यानंतर फेसबुक सोडण्याचा विचार खूपच गांभीर्याने करत आहोत. फॉलोअर्सच्या माहितीचा गैरवापर होत आहे, आम्ही देखील फेसबुक पेज डिलीट केले पाहिजे अशी विनंती आमच्या अडीच कोटी फॉलोअर्सने केल्याने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे कुपर हेफनर यांनी ट्विट करून सांगितले आहे. त्यानुसार आता प्लेबॉयने आपले अधिकृत फेसबुक पेज डिलीट केले आहे. प्लेबॉयने अधिकृत घोषणा करत आपला #DeleteFacebook ला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता जगभरातील कोट्यवधी ग्राहकांना यापुढे फेसबुकद्वारे येणाऱ्या खुसखुशीत अपडेट्स पाहता येणार नाहीत.

Leave a Comment