
मुंबई : या महिन्याच्या अखेरीस लागोपाठ ५ दिवस बँका बंद असणार आहेत. बँकांमध्ये २९ मार्च ते २ एप्रिलपर्यंत कोणतेही व्यवहार करता येणार नसल्यामुळे बँकांमधील तुमची कामे बुधवारच्या आता उरकून घ्या. २९ मार्चपासून चेक क्लिअरन्स आणि ड्राफ्टही बनणार नाहीत.
या आठवड्यात सलग ५ दिवस बंद राहणार बँका
महावीर जयंती २९ मार्च, गुड फ्रायडे ३० मार्च, बँकांची क्लोजिंग डेट ३१ मार्चला तसेच १ एप्रिलला रविवार आणि २ एप्रिलला अॅन्यूअल क्लोसिंग असल्याने सलग ५ दिवस बँका बंद असणार आहेत. बँका ५ दिवस बंद असल्यामुळे जीएसटी, वीम्याचे हफ्ते आणि आयकर जमा करण्याची शेवटची तारीख २७ मार्च करण्यात आली आहे. सरकारी कार्यालयही या ५ दिवसांमध्ये बंद असल्यामुळे या कार्यालयांना आर्थिक वर्षाचे शेवटचे व्यवहार २८ मार्चपर्यंत पूर्ण करावे लागणार आहेत.
