आकाश अंबानी डिसेंबरमध्ये होणार विवाहबद्ध


मुंबई : यावर्षी डिसेंबर उद्योगपती मुकेश अंबानी यांचे थोरले चिरंजीव आकाश अंबानी यांचं शुभमंगल महिन्यात होणार आहे. त्याआधी जून महिन्यात त्यांचा साखरपुडा होईल.

रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश आणि नीता अंबानी यांनी परिवारात होणाऱ्या या शुभकार्यापूर्वी सिद्धिविनायकाचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. होणाऱ्या सुनेसह परिवारातील सर्व सदस्य सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित होते. हिऱ्यांचे व्यापारी असलेल्या रसेल मेहता यांची कन्या श्र्लोका मेहता हिच्याशी आकाश अंबानी याचे लग्न होणार आहे. आकाश आणि श्र्लोका दोघेही एकाच शाळेत शिकले आहेत. मुंबईतच त्यांचे लग्न संपन्न होईल. हे लग्न चार ते पाच दिवस चालेल अशी सर्वत्र चर्चा आहे.

Leave a Comment