प्राइम मेंबरशिप सबस्क्रिप्शनपूर्ण बंद करू शकते जिओ ?


नवी दिल्ली – रिलायन्स जिओने स्वस्त कॉलिंग, इंटरनेट आणि स्वस्तातल्या मोबाईल फोनच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करत भारतीय टेलिकॉम क्षेत्राला हादरवून ठेवले होते. जिओने लॉन्च झाल्याच्या सहा महिन्यांपर्यंत मोफत सेवा दिल्यानंतर ९९ रुपयांची प्राइम मेंबरशिप ऑफर लॉन्च केली होती. कंपनीने हि मेंबरशिप घेतल्यानंतर एक वर्षासाठी कमी किंमतीत रिचार्ज आणि जास्त फायदे देण्याची घोषणा केली होती.

जिओ प्राइम मेंबरशिपची सुरूवात १ एप्रिल २०१७ रोजी झाली आणि त्याची वैधता ३१ मार्च २०१८ पर्यंत आहे. आता त्याच सबस्क्रिप्शनची अंतिम घटिका जवळ आली असून जिओकडून लवकरच कोणतीतरी नवी घोषणा केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पण अद्याप जिओकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यातच प्राइम मेंबरशिप सबस्क्रिप्शनपूर्ण जिओ बंद करू शकते किंवा मोफत सेवा म्हणून आधीपासून सबस्क्रिप्शन केलेल्या ग्राहकांना वापरण्याची मुभा देऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर जिओ आपल्या ग्राहकांना पुन्हा एखादे सरप्राइज देखील देऊ शकते असेही म्हटले जात असल्यामुळे जिओ कोणती नवी घोषणा करणार त्याकडे ग्राहकांसह टेलिकॉम क्षेत्राचेही लक्ष लागून आहे.

Leave a Comment