अडीच लाखांनी स्वस्त झाली यामाहाची हि बाईक


मुंबई : डिसेंबर २०१७ मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या ‘यामाहा आर १’ या बाईकच्या किंमतीत प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. लॉन्चवेळी तिची शोरुम किंमत २०.७३ लाख निर्धारित करण्यात आली होती. या बाईकच्या किंमतीत आता तब्बल २.५७ लाखांनी घट झाली आहे. त्यामुळे, जर तुम्हाला आता ‘यामाहा आर १’ ही बाईक घ्यायची असेल तर केवळ १८.१६ लाखांत उपलब्ध होईल. ही घट करणे सीबयू इंपोर्टसमध्ये नुकतीच एक्साईज ड्युटी कमी करण्यात आल्यामुळे शक्य झाले आहे.

टेक ब्लॅक आणि ब्लू अशा दोन रंगांत ‘यामाहा आर १’ ही बाईक उपलब्ध असून ९९० सीसीचे क्रॉस प्लेन, ४ सिलिंडर, ४ वॉल्व इंजिन यात उपलब्ध आहे. तसेच इंजिन १९७.२ बीएचपी पॉवर आणि ११२ न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. ६ स्पीड गियरबॉक्ससहीत इंजिन, क्विक शिफ्ट सिस्टम, लिफ्ट कंट्रोल सिस्टम, एलईडी हेडलॅम्प अशा सुविधाही देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment