जनधन खात्यांपैकी तब्बल २० टक्के खाती निष्क्रिय


नवी दिल्ली : अर्थ राज्य मंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी राज्यसभेत लिखित उत्तर देताना देशातील एकूण ३१ कोटी रुपये जनधन खात्यांपैकी तब्बल २० टक्के खाती निष्क्रिय असल्याची माहिती दिली आहे. सुमारे ७५ हजार कोटी रुपये फेब्रुवारीपर्यंत उघडण्यात आलेल्या ३१.२० कोटी जनधन खात्यांमध्ये जमा करण्यात आले. ज्यातील २५.१८ कोटी खात्यांमध्ये देण्याघेण्याचे व्यवहार सुरु आहेत. याचाच अर्थ प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत खोलण्यात आलेली ६ कोटीहून अधिक खाती निष्क्रिय आहेत.

शिव प्रताप शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल ५९ लाख जनधन खाती ही योजना सुरु झाल्यानंतर फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आली. जनधन खाती खातेधारकांनी केलेल्या विनंतीनंतर बंद करण्यात आली. १५ ऑगस्ट २०१४मध्ये पंतप्रधान नरेंद्र यांनी जनधन योजनेची घोषणा केली होती. २८ ऑगस्ट २०१४मध्ये याची सुरुवात झाली. याची सुरुवात म्हणून पंतप्रधानांनी सर्व बंकांना ईमेल पाठवले. योजनेच्या उद्घाटनाच्या दिवशी १.५ कोटी बँक खाती खोलण्यात आली.

Leave a Comment