भारतासहित जगभरातील निवडणुकांमध्ये अखंडत्व राखण्यासाठी फेसबुक बांधिल


नवी दिल्ली – फेसबुकचा डेटा अमेरिकेतील निवडणुकीत वापरण्यात आल्याच्या रिपोर्टवर चिंता व्यक्त करताना फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग याने भारतासहित जगभरातील निवडणुकांमध्ये अखंडत्व राखण्यासाठी आमची कंपनी बांधिल असल्याचे सांगितळे आहे. मार्क झुकेरबर्गने सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रशियासारख्या देशाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे मान्य केले असून आपल्या संस्थेने असे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कोणती पावले उचलली नसल्याची माहितीही त्याने यावेळी दिली.

आता खूप मोठी जबाबदारी आमच्यावर असून आमच्यासाठी २०१८ अमेरिकेचा मध्य कालावधी असून हा खूप मोठा मुद्दा आहे. आता त्याच्यावर आमचा फोकस असणार आहे. त्याचबरोबर भारतात आणि ब्राजिलमध्येही पुढील वर्षी मोठी निवडणूक होत आहे. महत्वाच्या निवडणुका जगभरातील अनेक देशांमध्ये पार पडणार असून फेसबुकवर या निवडणुकांचे अखंडत्व सुरक्षित राहिल ही आमची जबाबदारी असून यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करु, असे झुकेरबर्गने सांगितले आहे. मार्क झुकेरबर्गने ही माहिती अनेक देशांमधील निवडणूक प्रक्रियेत बाहेरील गोष्टींचा प्रभाव पडू नये यासाठी फेसबुकने काय उपाययोजना केल्या आहेत या प्रश्नावर बोलताना दिली.

Leave a Comment