जिओच्या फिचर फोनमध्ये लवकरच सुरु होणार व्हॉट्सअॅप


नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या फिचर फोनमध्ये लवकरच व्हॉट्सअॅपची सुविधा मिळणार असून सध्या कायसो ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या जिओ फोनमध्ये व्हाट्सअॅप सपोर्ट करत नाही. कंपनी सध्या व्हाट्सअॅपशी चर्चा करत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. जिओ फोनसाठी गेल्या महिन्यात कंपनीने फेसबुक अॅपचे विशेष व्हर्जन लॉन्च केले होते. या अॅपमध्ये पुश-नोटिफिकेशन, व्हिडिओ आणि एक्सटरनलकंटेंट लिंकला सपोर्ट करणारे फिचर सामिल आहेत.

याबाबत WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार KaiOS साठी कंपनी एक नवीन अॅपवर काम करत आहे. त्यामुळे जिओ फोन युजर्संना लवकरच व्हॉट्सअॅपचा वापर करता येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर लेटेस्ट व्हॉट्सअॅप बिटा विंडोज फोन अॅप 2.18.38 मध्ये एक नवीन KaiOS अॅप बनवले जात आहे. कायसो ओएसचा जिओ फोन भारतीय युजर्समध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. आतापर्यंत ६० लाखांहुन अधिक युनिट विकले गेले आहेत. व्हॉट्सअॅपचे जगभरात दीड अरब युजर्स आहेत. आणि अजूनही युजर्स वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment