व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक म्हणतात; हीच योग्य वेळ आहे, फेसबुक डिलीट करा


ट्विटरच्या माध्यमातून फेसबुक डिलीट करण्याचे आवाहन व्हॉट्स‍अॅपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी केले आहे. ट्विट करत ब्रायन अॅक्टन यांनी हीच योग्य वेळ असून फेसबुक डिलीट करा असे सांगितलं आहे. काही दिवसांपुर्वी राजकीय डाटा विश्लेषक कंपनी कॅम्ब्रिज ऍनालिटिकाने कोणतीही परवानगी न घेता फेसबुकवरील पाच कोटी युजर्सचा डेटा चोरल्याचे समोर आल्यानंतर हे ट्विट करण्यात आले आहे. फेसबुकवरील गोपनीयतेवर या प्रकरणानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

२०१४ मध्ये व्हॉट्सअॅपला फेसबुकने खरेदी केले होते. कॅम्ब्रिज ऍनालिटिका व्हॉट्सअॅपची विक्री झाल्यानंतरही फेसबुकशी जोडलेले होते. पण आपली स्वत:ची सिग्नल फाऊंडेशन कंपनी सुरु करण्यासाठी त्यांनी वर्षाच्या सुरुवातीला फेसबुकला रामराम केला.

Leave a Comment