गर्दी खेचतेय चारचाकी इलेक्ट्रिक स्कूटर, कुडर


स्वित्झर्लंड येथे सुरु असलेल्या जिनेव्हा मोटर शो मध्ये स्विस कंपनी क़्वाडो व्हेईकलने सादर केलेली चारचाकी इलेक्ट्रिक गाडी गर्दीचे आकर्षण ठरली असून ही एक एलेक्ट्रीक स्कूटर आहे. या स्कूटरचे खास वैशिष्ट म्हणजे चार्ज संपला तर ती स्वतःच चार्जिंग स्टेशनचा पत्ता चालकाला सांगते. त्यामुळे चालकाचा वेळ वाचतो. मोबिलिटी कन्सेप्टवर आधारित अशी ही कारबाईक आहे. तिला कार आणि बाईकची अनेक फीचर्स दिली गेली आहेत.

ही स्कूटर पोल्युशन फ्री आहे. सर्वप्रथम ती युरोपीय बाजारात आणली जाणार आहे. ही स्कूटर स्पीडमध्ये असतानाही सहज वळविता येते. ओल्या रस्त्यावर तिची चाके घसरत नाहीत. तिला सिंगल सिलिंडर चार स्ट्रोक ४०० सीसी इंजिन दिले गेले आहे. शिवाय शॉक अब्सोर्बिंग हायड्रोलिक सिंगल व्हील सस्पेन्शन, कम्बाइन्ड ऑल व्हील ब्रेकिंग सिस्टीम दिली गेली आहे. कंपनीचे सीईओ पाओला गगलीअर्डो म्हणाले हे वाहन अतिशय सुरक्षित असून ते गेम चेंजर सिद्ध होईल याची खात्री आहे.

Leave a Comment