जिओने केला अजून एक धमाका


नवी दिल्ली : स्वस्त दरात नवनवे प्लॅन्स सादर केल्यानंतर रिलायन्स जिओने अजून एक नवे प्रॉडक्ट स्वस्त दरात युजर्ससाठी उपलब्ध केले असून आता भारतीय बाजारात जिओफाय लाईनअपचा विस्तार कंपनी करणार आहे. कंपनीने याअंतर्गत जिओफाय ४जी एलटीई हॉटस्पॉट डिव्हाईस लॉन्च केला आहे. ९९९ रुपये याची किंमत असून जिओफाय JMR815 असे नाव जिओच्या या नव्या मॉडलला देण्यात आले आहे.

या प्रॉडक्टची कंपनी वर्षभराची व्हॉरंटीने देत असून १५०Mbps याचा डाऊनलोड स्पीड तर ५०Mbps अपलोड स्पीड आहे. फ्लिपकार्टवर याची खरेदी इच्छुक करु शकतात. या डिव्हाईसला जिओने आपल्या डिजाईन इन इंडिया अशी टॅगलाईन दिली आहे. नवीन जिओफाय मॉडल नवीन गोलाकार आकारात असून पूर्वी याचा आकार अंडाकृती होता. यात पॉवर ऑन/ऑफ आणि WPS वायफाय प्रोटेक्टेड सेटअप सारखे बटन्स दिले आहेत. यात बॅटरी, ४जी आणि वायफाय सिग्नलसाठी नोटिफिकेशन लाईट्सही आहेत.

३२ युजर्स यात एकावेळी कनेक्ट होऊ शकतात. यात ३१ वाय-फायच्या माध्यमातून आणि १ युएसबीच्या माध्यमातून कनेक्ट होऊ शकतात. कनेक्ट झाल्यानंतर स्मार्टफोन्सवर जिओ ४जी व्हॉईस अॅपच्या माध्यमातून एचडी व्हाईस आणि व्हिडिओ कॉल्स करु शकाल.

Leave a Comment