सरकारी कर्मचाऱ्यांसाठी टोयोटाची खास ऑफर


मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी टोयोटा इंडियाने एक खास ऑफर नुकतीच लाँच केली असून सरकारी कर्मचाऱ्यांना ‘ड्राईव्ह द नेशन’ या अंतर्गत इनोव्हा क्रिस्टावर १०० टक्के ऑन-रोड फायनान्स, इश्युरन्स, अॅक्सेसरीज आणि अतिरिक्ट वॉरंटी देण्यात येणार आहे.

२०१६ साली ड्राईव्ह द नेशन कॅम्पेन टोयाटाने सुरु केले होते. इटियॉस आणि कोरोला एल्टिस यांचा या कॅम्पेनमध्ये समावेश होता. यामध्ये आता इनोव्हा क्रिस्टाचा देखील समावेश करण्यात आला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना या स्कीममध्ये आठ वर्षासाठी १०० टक्के ऑन-रोड कर्ज देण्यात येणार आहे. म्हणजेच कोणतेही डाऊन पेमेंट न करता टोयोटा इनोव्हा क्रिस्टा तुम्ही घरी आणू शकता. सर्वसामान्यपणे कारवर सात वर्षासाठी कर्ज देण्यात येते. यामध्ये एक्स शोरुम किंमतीवर ८५ टक्के कर्ज दिले जाते. पण ड्राईव्ह द नेशन या अंतर्गत इनोव्हा क्रिस्टावर आठ वर्षासाठी फायनान्स देण्यात येणार आहे.

Leave a Comment