आमिर खान व्हिवोचा ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसेडर


मुंबई : भारतामध्ये व्हिवो या चायनीज कंपनीच्या मोबाईलने खूप लोकप्रियता मिळवली असून आता व्हिवो या कंपनीच्या ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसडरपदी अभिनेता आमिर खानची निवड करण्यात आली आहे. याबाबतची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.


याबाबत माहिती देताना व्हिवो इंडियाचे सीएमओ केनी झेंग यांनी सांगितले की, भारतातील आमिर खानसारख्या सुपरस्टारसोबत टाय अप झाल्यानंतर आता भविष्यात अनेक नव्या संधी खुल्या होणार आहेत. लवकरच आमिर खान व्हिवोच्या टेलिव्हिजन अ‍ॅडमध्येही झळकणार आहे. २०१४ साली भारतीय बाजारपेठांमध्ये व्हिवोचा प्रवेश झाला होता.

Leave a Comment