४जी इंटरनेट स्पीडमध्ये सिंगापूर अव्वल!


नवी दिल्ली : देशाच्या अन्य शहरांच्या तुलनेत नवी मुंबईचा ४जी इंटरनेट स्पीड खूप अधिक असून याबाबत ओपेनसिग्नलने दिलेल्या रिपोर्टनुसार, ८.७२ एमबीपीएस नवी मुंबईत ४जि इंटरनेट स्पीड आहे. तर चेन्नईने मार्च २०१७ मध्ये ४जी इंटरनेटचा स्पीड दुप्पट करण्यात यश प्राप्त केले आहे. हा स्पीड पूर्वी ४.४ एमबीपीएस होता आता मात्र ८.५२ एमबीपीएस एवढा झाला आहे. ८.४६ एमबीपीएससोबत कोलकत्ता तिसऱ्या स्थानावर आहे. भारतात ४जी जिओचे जबरदस्त प्रस्थ असताना देखील पूर्ण जगातील आकड्यांनुसार ४जी इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारताचा क्रमांक खालचा आहे.

रिपोर्टनुसार, ४जी इंटरनेट स्पीडच्या जगात भारताने ८२.२६% सोबत १४ वे स्थान प्राप्त केले आहे. हे स्थान म्हणजे तसे चांगला संकेत आहेत. पण भारताचा ४जी स्पीडच्या बाबतीत क्रमांक तसा शेवटचा आहे. सिंगापूरचा या यादीत प्रथम क्रमांक लागतो. सिंगापूर ४४.३१ एमबीपीएस स्पीडसोबत जगात अव्वल आहे.

Leave a Comment