३० एप्रिलपर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बँका सीबीएसला जोडणार ‘स्विफ्ट’ सिस्टीम्स


नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना पंजाब नॅशनल बँकेसारखे आर्थिक घोटाळे टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून ३० एप्रिलपर्यंत त्यांच्या ‘स्विफ्ट’ सिस्टीम्स (सोसायटी फॉर वर्ल्डवाईड इंटरबँक फायनान्शिअल टेलिकम्युनिकेशन्स) संबंधित कोअर बँकिंग सोल्यूशनला (सीबीएस) जोडाव्या लागणार आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या अधिकाऱ्यांची रिस्क मॅनेजमेंट या विषयावर कार्यशाळा पार पडली. हा निर्णय यात घेण्यात आला. तसेच सरकारी बँकांनीही “सायबर विमा” त्वरित काढण्याचे यावेळी ठरवले. ‘स्विफ्ट’ सिस्टम्सचा गैरफायदा घेत पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात बँकेतील अधिकाऱ्यांनी परदेशी निधी हस्तांतरित केले. बँकेच्या अंतर्गत व्यवहार मेसेजिंग सिस्टममध्ये या व्यवहारांची नोंदणी न झाल्यामुळे हा घोटाळा बराच काळ उघडकीस आला नाही. ‘स्विफ्ट’ सिस्टीम्स सीबीएसला जोडायला आरबीआयनेही सांगितले होते.

यापुढे सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत ‘स्विफ्ट’ व्यवहार करता येणार नसल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापक एम. एस. शास्त्री यांनी सांगितले. तसेच बँका ठिकठिकाणी सायबर सुरक्षा ऑपरेशन केंद्र उभारणार आहेत.

Leave a Comment