व्होडाफोन २१ रुपयांत देत आहे अनलिमिटेड इंटरनेट डेटा!


मुंबई : इतर टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी नवनवे आकर्षक प्लॅन्स सादर करत आहेत. त्यात आता २१ रुपयांचा प्लॅन व्होडाफोनने सादर केला आहे. हा प्लॅन आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी कंपनी घेऊन आली आहे.

युजर्सला व्होडाफोनच्या या पॅकमध्ये 3G/4G इंटरनेट डेटा मिळत आहे. या प्लॅनची व्हलिडिटी एक दिवसाची असून युजर्संना या प्लॅनमध्ये एका तासासाठी अनलिमिटेड डेटा मिळेल. मात्र यात कोणताही टॉकटाईम मिळणार नाही.

Leave a Comment