आता एका मिस कॉलवर मिळावा पीएफची माहिती


नवी दिल्ली : आता एका मिस कॉलमध्ये युनिवर्सल अकाऊंट नंबर पोर्टलवर रजिस्टर सदस्य ईपीएफओबद्दलची माहिती मिळवू शकतो. तुम्हाला ही माहिती मिळवण्यासाठी ०११-२२९०१४०६ या नंबरवर मिस कॉल द्यावा लागेल. पण या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे युनिफाईड पोर्टलचे युएएन सक्रिय असणे आवश्यक आहे. रजिस्टर मोबाईलवरुन ०११-२२९०१४०६ या नंबरवर फोन केल्यास फोन आपोआप कट होईल. ही सेवा सदस्यांसाठी मोफत उपलब्ध आहे.

जर युएएन सदस्याचे कोणत्याही एका बॅंक खात्याशी, आधार कार्डशी आणि पॅन कार्डशी जोडलेले असल्यास सदस्याला भविष्य निधी बचतीची माहिती मिळू शकेल. उमंग अॅपवर मिस कॉल आणि एसएमएसच्या माध्यमातून माहिती प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यूएएन सक्रिय सदस्य आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन ७७३८२-९९८९९ या नंबरवर एसएमएस पाठवून ईपीएफओकडे उपलब्ध बचत आणि पीएफ योगदानाची माहिती मिळवू शकतात. त्यासाठी ईपीएफओएचओ यूएएन लिहुन ७७३८२-९९८९९ या नंबरवर पाठवा. ही सुविधा उपलब्ध आहे. इंग्रजी, हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलगु, तामिळ, मल्याळम आणि बांग्ला या भाषांमध्ये उपलब्ध आहे. इंग्रजीसोडून इतर कोणत्याही भाषेत एसएमएस प्राप्त करण्यासाठी निवडलेल्या भाषेचे पहिले तीन शब्द युएएननंतर लिहावे.

Leave a Comment