अनेक लोकप्रिय कार्सना धक्का देणार टोयोटाची ‘ही’ नवीन दमदार कार !


नवी दिल्ली : सिडेन यारिस ही आपली नवीन जबरदस्त कार घेऊन लवकरच टोयोटा बाजारात येणार असून कंपनीची ही सी सेगमेंटची पहिलीच कार आहे.

यावर्षी मे महिन्यात ही कार लॉन्च केली जाऊ शकते. ६ स्पीड मॅन्युअल आणि ७ स्पीड सीवीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स १.५ लीटर पेट्रोल इंजिन असलेल्या या कारमध्ये देण्यात आले आहेत. पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात या कारची बुकिंग सुरू होणार असून या कारची भारतात स्पर्धा वेगवेगळ्या लोकप्रिय कंपन्यांसोबत असणार असल्याचे बोलले जात आहे.

रूफ माऊंटेड रिअर एसी वेंट्स, पॉवर अ‍ॅडजेस्टेबल फ्रन्ट सीट. सात एअरबॅग्स आणि फ्रन्ट पार्किंग सेंसर नव्या टोयोटा सिडेनमध्ये प्रमुख आहेत. भारतात या नव्या कारची किंमत १० ते १२ लाख रूपये असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment