एअरटेलचा ४९९ रूपयांचा सुपर पोस्टपेड प्लॅन


नवी दिल्ली : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत. इंटरनेटचा आज मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे. मार्केटमध्ये अनेक मोठमोठ्या कंपनी आल्या आणि ते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जास्तीत जास्त डेटा पॅक देत आहेत. ग्राहकांना आता डेटा प्लॅन्ससोबत एक्स्ट्रा फायदाही हवा असल्यामुळे आपल्या ग्राहकांची ही गरज ओळखून एअरटेलने एक नवीन ऑफर आणली आहे. एअरटेलने ग्राहकांच्या या गरजा पूर्ण करण्यासाठी ४९९ रूपयांचा नवा पोस्टपेड प्लॅन आणला आहे.

यूजर्सला एअरटेलच्या ४९९ च्या प्लॅनमध्ये ४० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल्स, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स तर मिळणारच सोबतच आणखीही काही फायदे या प्लॅनमध्ये मिळणार आहेत. Wynk Music आणि Airtel TV चा अ‍ॅक्सेस ४९९ च्या या प्लॅनमध्ये मोफत मिळणार आहे. ३०० टीव्ही चॅनल, क्लासिक आणि नवीन चित्रपट Airtel TV च्या माध्यमातून बघू शकाल. ४९९ रूपयांच्या या प्लॅनमध्ये ५०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत अ‍ॅमेझॉन प्राइमचे सब्सक्रिप्शन मिळेल.