वजनदार पोलिसाने मानले खिल्ली उडवणाऱ्या शोभा डेंचे आभार


मुंबई: मध्य प्रदेशातील लठ्ठ पोलीस अधिकारी दौलतराम जोगावत यांना स्तंभलेखिका शोभा डे यांनी ट्विट करुन केलेल्या अपमानाचा चांगलाच फायदा झाला असून डे यांनी गेल्या वर्षी ट्विट केल्यानंतर जोगावत यांनी वजन कमी करण्याचे मनावर घेतले. त्याचबरोबर त्यांनी मुंबई गाठून वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली. ज्यामुळे जोगावत आता १८० किलोवरुन थेट ११५ किलोवर आले आहे. एकूण ६५ किलो वजन त्यांनी घटवले आहे.

तसेच दौलतराम जोगावत यांनी डाएट आणि व्यायाम करुन अजून ३० किलो वजन कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जोगावत यांच्यावर मुफज्जल लकडावाला यांनी मोफत शस्त्रक्रिया केली आहे. जोगावत यांच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात गॅस्ट्रिक बायपास प्रोसिजर झाली. या सगळ्या प्रकारानंतर जोगावत यांनी शोभा डे यांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट केल्यामुळेच वजन कमी करण्याचा आपण गांभीर्याने विचार केला, असे जोगावत म्हणाले.

Leave a Comment