वजन घटविण्यासाठी आईस थेरपी


वजन घटविण्यासाठी अनेक पर्याय अंमलात आणले जातात. अनेक तऱ्हेची डायट, वर्क आउट्स, थेरपीज, एक न अनेक तऱ्हा वजन घटविण्यासाठी आजमावल्या जात आहेत. यामध्ये sauna, किंवा हीट थेरपी, हॉट योगा ह्या नवीन थेरपीज लोकप्रिय ठरत आहेत. पण वजन घटविण्यासाठी आईस थेरपी देखील उपयोगाला येऊ शकते हे तुम्हाला ठाऊक आहे का? आईस थेरपीबद्दल फार कमी लोकांना ठाऊक असेल. ही थेरपी मेक्सिको मध्ये सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी अस्तित्वात आली, आणि आता ही थेरपी संपूर्ण जगामध्ये अतिशय वेगाने लोकप्रिय होत आहे.

आईस थेरपी म्हणजे नक्की काय, तर शरीराच्या ज्या भागावर अतिरिक्त चरबी असेल, किंवा शरीराच्या ज्या भागावरील त्वचा शिथिल झाली असेल, तिथे बर्फाचा वापर करून तेथील चरबी घटविणे किंवा त्वचा ‘tighten’ करणे. यासाठी निरनिराळ्या प्रकारचे आईस पॅक्स, आईस जेल्स वापरण्यात येतात. त्वचेच्या कोशिकांना किंवा टिश्यूज् ना बळकट करण्याचे काम आईस थेरपीद्वारे केले जाते. आईस थेरपी केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारून त्वचेचा पोत सुधारण्यास मदत तर होतेच, शिवाय त्या भागातील अतिरिक्त चरबी घटण्यासही मदत होते.

आईस थेरपीद्वारे शरीराचे शिथिल झालेले भाग किंवा सैल पडलेली त्वचा पुन्हा कसता येणे शक्य झाले आहे. तसेच यामध्ये त्वचेखालील सेल्युलाईट कमी होऊन शरीर ‘डी-टॉक्सिफाय’ होण्यास मदत मिळते. त्यामुळे वजन कमी होण्यास ही सहाय्य मिळते. आईस थेरपीच्या जोडीने योग्य आहार आणि हलका व्यायाम घेतल्याने लवकर चांगले परिणाम दिसून येतात. २००० साली ही थेरपी मेक्सिकोमध्ये सुरु झाली, आणि आजही वजन घटविण्यासाठी उत्तम मसाज टेक्निक म्हणून या थेरपीचा वापर तिथे केला जातो.

युरोप आणि अमेरिकेमध्ये देखील खास आईस थेरपी देणारी किल्निक्स आहेत. येथे आधी ‘मड बाथ’ च्या सहाय्याने, म्हणजेच औषधी मातीचा लेप संपूर्ण शरीरावर लाऊन शरीराचे ‘क्लेन्जिंग’, म्हणजेच त्वचेची स्वच्छता केली जाते आणि मग आईस थेरपी दिली जाते. आधी दिल्या गेलेल्या ‘मड बाथ ‘ मुळे आईस थेरपी अधिक प्रभावी ठरते. या थेरपीचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स अजूनपर्यंत ऐकिवात नाहीत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment