व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे मेसेंजर अॅप धोक्यात


नवी दिल्ली – ब्लॅकबेरीने टेक्नोलॉजी चोरल्याचा आरोप लोकप्रिय मेसेंजिंग अॅप व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर केला असल्यामुळे जगभरात वापरण्यात येणारे व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे मेसेंजर अॅप धोक्यात आहे. फेसबूक आणि व्हॉट्सअॅपचा वापर इंटरनेटचा विस्तार झाल्यापासून बेसुमार वाढला आहे.

याबाबत रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुकवर मॅसेंजर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामसाठी आपली टेक्नोलॉजी चोरल्याचा आरोप ब्लॅकबेरीने केला आहे. या अॅपवर सध्या सुरु असेलेले फिचर आमची पेटेंट टेक्नोलॉजी असल्याचा दावा ब्लॅकबेरीने केला आहे. ब्लॅकबेरीने केलेल्या दाव्यानुसार, ब्लॅकबेरीच्या टेक्निकचा प्रयोग फेसबुक इंस्टन्ट मॅसेजिंग अॅप, व्हॉट्सअॅपमध्ये करत असल्यामुळे लॉस इंजेलिसमधील न्यायालयात ब्लॅकबेरीने फेसबुकवर टेक्नोलॉजी चोरी केल्याचा खटला दाखल केला आहे.

ब्लॅकबेरी १५ वर्षापूर्वी मॅसेंजर युजर्समध्ये लोकांच्या पहिल्या पसंतीचे होते. आपल्या युजर्ससाठी नवनवे प्रयोग करणाऱ्या फेसबुक, व्हॉट्सअॅपवर ब्लॅकबेरीने चोरीचा आरोप केला असल्यामुळे आता यांच्याच कायदेशीर लढाई सुरु झाली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप हे आम्ही डेव्हलप करण्यात आलेल्या टेक्निकचा वापर करत आहे असा ब्लॅकबेरीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment