या मॉडेल्सनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कमावले कोट्यावधी रुपये


आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन प्रसिद्धी मिळवत कोट्यवधी रुपये कमविणाऱ्या मॉडेल्सची माहिती देणार आहोत. या मॉडेल्सनी सुडोल बांधा आणि सोशल फॅन्सच्या माध्यमातून कोट्यवधींची माया जमवली आहे. अनेक कंपन्यांनी त्यांना त्यांचे लाखो फॅन्स असल्याने जाहिराती दिल्या आणि मॉडेल म्हणून काम करण्याची संधी दिली. तर काही कंपन्यांनी सोशल स्पेसवर त्यांचा वापर केला.

त्यात अॅना चेरी या मॉडेलचा समावेश असून कॅलिफोर्नियाच्या अॅनाला अनेक भावंडे होती. ती एक टॉमबॉय असून प्रसिद्ध सप्लिमेंट ‘श्रेज’साठी ती मॉडेलिंग करते. सुडोल बांध्यामुळे ती कायम चर्चेत राहते. तिचे इन्स्टाग्रामवर ४६ लाख फॉलोअर्स आहेत.

एका डेडिकेटेड अॅपच्या माध्यमातून २४ वर्षांच्या ऑस्ट्रेलियन मॉडेल कायला इस्टीन्सने ४८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. व्यायामासाठी ती लोकांना मार्गदर्शन गाईड करते. विशेष म्हणजे ती व्यायाम करुन सुडोल बॉडी घडविलेल्या फॉलोअर्सचे फोटोही पोस्ट करते. सध्या तिचे ४१ लाख फॉलोअर्स आहेत.

ब्राझिलच्या २२ वर्षीय क्लॉडिया एलेन्डेला सोशल मीडियावर २८ लाख लोक फॉलो करतात. तिने अंडर गारमेंटची अॅड करुन आतापर्यंत २० कोटी रुपये कमवले आहेत. सुडोल शरीराच्या बळावर ती अनेक कॉंटेस्टमध्येही सहभागी होते.

अमेरिकाच्या चंटल जेल्सच्या इन्स्टाग्रामवर ३० लाख फॉलोअर्स आहेत. स्विमिंग आणि फुटबॉलची तिला बालपणी आवड होती. अनेक कंपन्यांसाठी तिने मॉडेलिंग केले आहे. mirror.co.uk ने तिला टॉपच्या मॉडेल्समध्ये सहभागी केले होते.

२६ वर्षांची पेज हथवे ही मॉडेल सुडोल बांधा आणि व्यक्तिमत्त्वामुळे व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये कायम चर्चेत राहिली. तिचे इंन्स्टाग्रामवर ३३ लाख फॉलोअर्स आहेत. फिटनेस इंडस्ट्री आणि महिला तिला आयडिअल वुमन मानतात. याच वैशिष्ट्यांच्या बळावर तिने आतापर्यंत तब्बल ३७ कोटी रुपये कमवले आहेत. कोणतीही महिला आपल्या शरीराला परफेक्ट करु शकते. त्यासाठी तिने मन लावून मेहनत करायला हवी, असे ती सांगते.

Leave a Comment