दुबईत सुरु होणार पाण्यावर तरंगणारा बाजार


दुबईत बुर्ज खलीफा यांसारख्या बिल्डींगांसाठी पहिले एक फ्लोटींग म्हणजेच तरंगणारे मार्केट सुरु होणार असून या आयडीयावर सध्या बीयूलँड कंपनी काम करत आहे. याबाबत कंपनीचा फाउंडर शेखा माहा हशरने सांगितल्यानुसार या मेपर्यंत हे मार्केट सुरु होणार आहे. येथे १७ नावांमध्ये दुकाने आणि रेस्टोरंट असणार आहे.

ही आयडीया मॉलमध्ये जाऊन जाऊन बोर होणाऱ्या लोकांसाठी नक्कीच छान आहे. बँकॉक येथील फ्लोटींग मार्केटपासून प्रेरीत होऊन त्यांनी असा उपक्रम दुबईमध्ये करण्याचा विचार केला. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यावर बोटींवर लोकांना शॉपिंग करण्यास नक्कीच आनंद वाटेल असे सांगितले. जवळपास २ किमीचा परिसर दुबई क्रिकवर फिरण्यासाठी बनवण्यात आला आहे. येथेच हे मार्केट सुरु होणार आहे. येथे अनेक लोकल आणि इंटरनॅशनल ब्रँड असणार आहेत. कंपनीला विश्वास आहे ती पहिल्याच वर्षी जवळपास ९० लाख लोक या मार्केटमध्ये फिरण्यासाठी तसेच शॉपिंग करण्यासाठी येऊ शकतात.

Leave a Comment