हीरो मोटोकॉर्पची नवी आणि दमदार सुपर स्प्लेंडर लॉन्च


नवी दिल्ली : नवी सुपर स्प्लेंडर बाईक भारतातील सर्वात मोठी टू-व्हीलर कंपनी हीरो मोटोकॉर्पने लाँन्च केली असून १२५ सीसी असलेल्या नव्या सुपर स्प्लेंडरमध्ये आय३ एस टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे. नवी सुपर स्प्लेंडर जुन्या व्हर्जन पेक्षा अनेक पटीने अधिक चांगली असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

तरुणांना डोळ्यासमोर ठेवून कंपनीने ही नवी सुपर स्प्लेंडर तयार केली असून या नव्या बाईकमध्ये डिझाईन आणि फिचर्समध्ये अनेक बदल्स करण्यात आले आहेत. सुपर स्प्लेंडरच्या नव्या मॉडेलचा हा प्रीमिअर लूक आहे. या गाडीत सीटखाली स्टोरेज देण्यात आले आहे. यासोबतच साईड युटीलिटी बॉक्स आणि वाईड टायरने अपडेट केले आहे.

पाच रंगांत नवी हीरो सुपर स्प्लेंडर उपलब्ध असून यामध्ये पर्पल, ब्लॅक विथ रेड, ब्लॅक विथ सिल्वर, लाल आणि ग्रे या रंगांचा समावेश आहे. १२५ सीसी TOD (Torque-on-Demand) इंजिन या बाईकमध्ये देण्यात आले आहे. ४ स्पीड गिअरबॉक्स इंजिन असलेल्या या गाडीचे इंजिन जुन्या मॉडलपेक्षा अधिक दमदार आहे. १२५ सीसी असलेले हे इंजिन ७,५०० rpm वर ११.४ पीएसची पॉवर आणि ६,००० rpm वर ११ न्यूटन मीटरचे टॉर्क जनरेट करते.

आय ३ एस टेक्निकमुळे तुम्ही जर ट्रॅफिक जाममध्ये अथवा एखाद्या कामासाठी गाडी थांबवली आहे आणि तुमची बाईक न्यूट्रल मोडवर असेल तर बाईक ऑटोमेटिक बंद होईल. यामुळे तुमचे इंधन वाचण्यात मदत होणार आहे. याचा थेट परिणाम बाईकच्या मायलेजवर होणार आहे. दिल्लीतील एक्स शोरुममध्ये नव्या सुपर स्प्लेंडरची किंमत ५७,१९० रुपये आहे.

Leave a Comment